होलार समाजाला संत रोहिदास आर्थिक महामंडळामध्ये सामावून घ्या ; आ.अनिल बाबर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

0



विटा : होलार समाजाला संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी विट्याचे आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यात होलार समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते नेहमी शिवसेना पक्षाबरोबर काम करीत आहेत. हा समाज नेहमी सत्तेपासून वंचित राहिला आहे.






होलार समाजास आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याची गरज आहे.या समाजासाठी कोणत्याही राज्याच्या महामंडळामधून कर्ज दिले जात नाही. चप्पल तयार करण्यासाठी कातड्याचा व्यापाराला वैभव प्राप्त करून देण्यात चर्मकार समाजाबरोबर होलार, मांग व ढोर समाजाचेहि योगदान आहे.तरीही चर्मकार समाज बरोबर होलार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी होलार समाजाला आर्थिक विकास महामंडळात संचालक अथवा अध्यक्ष पदांवर समावेश केला जात नाही. 




Rate Card






यासाठी संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे.अन्यथा या होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. अखिल भारतीय होलार समाज संघटना (‘अ’ गट), महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.त्याअनुषंगाने आपण योग्य तो निर्णय घेऊन या दुर्लक्षित समाजाला न्याय द्यावा,असेही निवेदनात नमूद केले आहे.






Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.