81 अर्ज दाखल उमराणीकडे तालुक्याचे लक्ष | तीन पँनेलची तयारी पुर्ण

0उमराणी,वार्ताहर : जत तालुक्यातील उमराणीत ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार असल्याचे निश्चित झाले असून शेवटच्या दिवसापर्यत तब्बल 81 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.15 सदस्य संख्या असलेल्या उमराणीत तिंरगी लढत होणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष,मनसे युती,कॉग्रेस,भाजपा अशी पँनेलची जूळवाजुळव करण्यात आली आहे.

उमराणीतील 5 वार्डमधील 15 सदस्यासाठी 5,600 मतदार मतदान करणार आहेत.मात्र सध्या 81 अर्ज दाखल झाल्याने तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गतवेळीही तिंरगी लढत झाली होती.यावेळीही तिंरगी निवडणूक होण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे.सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती यांनीही ग्रामपंचायतीसाठी उमेदवार अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यांच्याकडे सत्ताधारी गटाचे नेतृत्व असून आताही त्यांनी पँनेल उभे करण्याची तयारी केली आहे.


Rate Card

शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे नेते दुडाप्पा बिरादार यांचे चिरजिंव मैदानात उतरले आहेत.काडाप्पा धनगोड, शंकर गदग, मल्लिकार्जुन यळमळी,सिध्दगोडा यळमळी हे नेतृत्व करत आहेत.उमराणी ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख आप्पासाहेब नामद यांनीही पँनेलची मजबूत तयारी केली असून यावेळी त्यांचे चिरजिंव वार्ड नंबर तीनमधून नशीब आजमावणार आहेत.सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याने छानणीनंतर उरलेले अर्ज मागे घेण्यासाठी सर्व पँनेल प्रमुखाची मोठी कसरत होणार आहे.यंदा उमराणीतील गावगाड्याचा तिंरगी सामना तालुक्यात रंगतदार होणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.