हुबळीमेड दारूची जत तालुक्यात विक्री | उत्पादन शुल्कचा अर्थपुर्ण पाठिंबा

0


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरबेकायदा,बोगस,गावठी,सिंदीचा महापूर आला आहे.स्थानिक गुन्हे शाखा,स्थानिक पोलीसाकडून कारवाई करण्यात येत आहे.मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अद्याप कोमात असून गेल्या वर्षभरात तालुकाभर बनावट दारूची विक्री होत असतानाही उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात नाही,यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रापंचायतीच्या निवडणूकीत या बनावट दारूचा विक्री होणार आहे.प्रत्यक्षात हुबळी मेडसह बनावट दारूचे कारखानेच जत तालुक्यात राजरोसपणे सुरू आहेत. 






मुख्य सूत्रधार आणि अन्य प्रमुख संशयित मात्र कारवाईच्या ‘रडार’बाहेरच असल्याचे चित्र आहे.उत्पादन शुल्क बनावट दारू निर्मितीत गुंतलेल्यांच्या मूळावर घाव कधी घालणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मूळात दारू ही आरोग्यासाठी हानीकारकच आहे. तरीही शासनाकडून दारू निर्मितीसाठी परवाना दिलेल्या कारखान्यांमधून उत्पादित दारूच्या विक्रीला परवानगी दिली जाते. राज्यात देशी, विदेशी दारू निर्मितीचे कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणारा कच्चा माल अल्कोहोल (स्पिरीट) मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांकडून पुरवला जातो. त्यानंतर तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली त्यापासून इसेन्स, रंग वापरून विविध ब्रँडची दारू बनवली जाते. 

Rate Card








त्यावर शासनासह अधिकार्‍यांची करडी नजर असते. त्यामुळे ती दारू बनावट दारूच्या तुलनेत कमी धोकादायक असते.याऊलट बनावट दारू तयार करणार्‍यांना त्याचे कोणतेही प्रशिक्षण नसते. कोणतीही प्रक्रिया न करता थेट स्पिरीट वापरून बनावट दारू तयार केली जाते. यामध्येही इसेन्स आणि रंग वापरले जातात. मात्र यामध्ये असणारे पाण्यासह अन्य वस्तूंचे प्रमाण शास्त्रीय नसल्याने ही दारू शरीराला अतिअपायकारक असते. एखाद्याने थेट स्पिरीट प्राशन केले तर त्याचा तात्काळ मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे ही बनावट दारू म्हणजे तळीरामांच्या आरोग्याशी खेळ असल्याचेच दिसून येत आहे.जत तालुक्यातील दोन ठिकाणी सुरू असणारा बनावट दारूचे कारखाने दोन वर्षांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य सूत्रधारासह सर्व संशयितांना अटक करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.