शेवटच्या क्षणापर्यंत झुंबड | ग्रामपंचायत निवडणूक : 890 उमेदवारी अर्ज दाखल | आज छाननी

0जत,प्रतिनिधी : ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा अखेरचा दिवस असल्याने एकच गर्दी उसळली होती.विहीत वेळेत सर्व कागदपत्रांसह मुहूर्तावर अर्ज दाखल करताना उमेदवारांसह स्थानिक नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसले.

शेवटच्या दिवशी तब्बल 514 नामनिर्देशन पत्रे ‌दाखल झाल्याने एकूण संख्या 890 झाली आहे.उमराणीत सर्वाधिक 81अर्ज दाखल झाले आहेत.
जत‌ तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींसाठी गेले आठ दिवस उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते.मध्यंतरी तीन दिवस सलग सुट्टी आल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती.त्यात ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरून त्याच्या प्रतीसह आवश्यक कागदपत्रांचा संच जोडावा लागत असल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढली होती.सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार बुधवारी अर्ज स्वीकारले गेले. शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच इच्छुकांची धांदल उडाली होती. ऑफलाईन अर्ज भरण्याची सोय केली असली, तरी कागदपत्रांचा संच तेवढाच जोडावा लागत असल्याने प्रक्रियेला उशीर होत होता. अर्ज दाखल करण्यासाठी वेळ वाढवून दिली असली, तरी शेवटच्या क्षणापर्यंत गर्दी होती. अनेक महिला लहान मुलांना घेऊन सकाळपासूनच बसून होत्या.
Rate Card

बुधवारी दाखल अर्ज कंसात एकूण दाखल नामनिर्देशन पत्र‌ संख्या ;

अंकलगी 15(30),अंकले 10(50),

भिवर्गी 19(33),धावडवाडी 23(27),डोर्ली 2(20),घोलेश्वर 22(28),गुड्डापूर 20(35),गुगवाड 14(36),जालीहाळ खुर्द 8(19),करेवाडी 16(22),कुडणूर 14(22)कुलाळवाडी 27(28),लमाणतांडा उटगी 5(11),लमाणतांडा दरिबडची 4(14),मेंढिगिरी 7(27),मोरबगी 21(25),निगडी बुर्दुक 21(34),सनमडी/मायथळ 38(41),शेड्याळ 32(38),शेगाव 16(48),सिध्दनाथ 21(21),सिंगनहळ्ळी 15(24),सोनलगी 27(27),तिकोंडी 19(19),टोणेवाडी 2(10)उमराणी 38(81),उंटवाडी 5(23),उटगी 27(58),वळसंग 20(30),येळदरी 6(29) 

पुढे कार्यक्रम

उमेदवारी अर्जांची छाननी – 31 डिसेंबर
माघार व चिन्हे वाटप – 4 जानेवारी

मतदान – 15 जानेवारी
मतमोजणी – 18 जानेवारी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.