जत,प्रतिनिधी : शेगाव (ता.जत) जवळ दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेचे कर्मचारी अजित नारायण ढोबळे (वय 50,रा.जत)यांचा रक्तस्राव झाल्याने मुत्यू झाला.घटना रविवारी रात्री 11च्या सुमारास घडला.याप्रकरणी सदोष मनुष्य वधास कारणीभूत धरत अखिल करीम मुजावर रा.शेगाव यांच्यावर जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,अजित ढोबळे हे गुंजेगाव,ता.मंगळवेढा येथे कामा निमित्त गेले होते.रवीवारी रात्री ते (एमएच 10,एजे 6682)या दुचाकीवरून परतत असताना शेगावपासून पुढे एक किलोमीटर अंतरावर जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर अखिल मुजावर यांच्या दुचाकी (केए 23,ईडब्लू 0044)ने समोरून धडक दिली.
ते रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.रक्तस्राव झाल्याने त्याचा मुत्यू झाला.घटनेची फिर्याद मयतचे चिरजिंव अक्षय ढोबळे यांनी जत पोलीसात दिली आहे.अखिल मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास आप्पासाहेब हाक्के करत आहेत.