जत,प्रतिनिधी : डफळापूर (ता.जत) येथे दुर्मिळ मांडूळ (दुतोंडी साप) विक्री करताना फरारी झालेला सिद्धेवाडी (ता.अथणी) येथील संशयित बाळकृष्ण अर्जुन कल्लोळी (वय 42) याला पकडण्यासाठी जत वनविभागाच्या पथकाने अथणी पोलिसांच्या सहाय्याने सिद्धेवाडी येथे छापा टाकला.मात्र कारवाई पुर्वीच संशयित बालकृष्ण कल्लोळी फरार झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, लोणारवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील विकास बजबळे याच्यासह बालकृष्ण कल्लोळी हा डफळापूर येथे मांडूळ विक्रीच्या हेतूने आले असताना जत पोलीसांनी छापा टाकून मांडूळसह एकजणास ताब्यात घेतले होते.यावेळी बाळकृष्ण कल्लोळी हा फरार झाला होता.जत पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण वन खात्याकडे वर्ग केले आहे.
अटकेतील विकास बजबळे हा जामिनावर बाहेर आला आहे.फरारी कल्लोळी याला पकडण्यासाठी जतचे वनपाल अधिकारी एम. एच. मोहिते, डी. एच.पवार, होस्पेटचे वनपाल चंदक्रांत ढवळे यांचे पथक फरारी कर्नाटकातील सिद्धेवाडी येथे आले होते.पंरतू त्याला पथकाची खबर लागल्याने त्यांने पुन्हा पळ काढल्याने पथकाला खाली हात माघारी फिरावे लागले.