पुतण्यावरील हल्ल्यानंतर चुलत्याची आत्महत्या | भिवर्गी येथील घटना ; पुतण्याची प्रकृत्ती स्थीर
जत,प्रतिनिधी : भिवर्गी ता.जत येथे घरगुती कारणावरून झालेल्या चुलत्या-पुतण्याच्या वादात चुलत्याने पुतण्यावर
कुऱ्हाडीने हल्ला करून गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.जखमी पुतण्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृत्ती गंभीर आहे.
घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,भिवर्गी येथील कोकरेवाडी वस्ती येथे घटनेतील मयत चुलता भाऊसो शंकऱ्याप्पा कोकरे (वय 55) हे मेंढरे राखण्याचा व्यवसाय करतात, तर पुतण्या भागाप्पा तायाप्पा कोकरे (वय 40)हा ऊसतोड मजूर आहे.सध्या तो कर्नाटकातील एका कारखान्यात ऊसतोडीस आहे.तो शनिवारी भिवर्गी येथे आला होता.मयत चुलता भाऊसो यांच्याबरोबर त्यांचा घरगुती वाद सुरू होता.रविवारीही सकाळी यातून वादावादी झाली होती.
त्यानंतर पुतण्या भागाप्पा हा भिवर्गी गावात ग्रामपंचायती समोर बसला होता.काही जणांना तो याबाबत काही जणांशी चर्चा करत होता.चुलते भाऊसो हेही गावात आले होते.नेहमीप्रमाणे त्यांच्यासोबत कुऱ्हाड होती.पुतण्या काहीतरी आपल्या विरोधात करेल,या भितीने चुलते भाऊसो यांनी हातातील कुऱ्हाडीने पुतण्या भागाप्पावर हल्ला केला.त्यात पुतण्या गंभीर जखमी झाला,रक्ताबंबळ पुतण्याला बघून केलेल्या कृत्याची भितीने चुलते भाऊसो कोकरे हे घरी न जाता थेट शेतात गेले,तेथे एका झाडाला दोरीने गळपास लावून जीवनयात्रा संपविली.
जखमी पुतण्याला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर आपल्या कर्मचाऱ्यांशी पोहचत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.उमदी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.त्यामुळे पुतण्यावर हल्ला कशासाठी केला हे कारण समजू शकले नाही.अधिक तपास कोळेकर करत आहेत.
