आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रूपयाला मागणी झालेला चोरीला गेलेला बकरा अखेर सापडला आहे.पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून बकऱ्यासह तीन संशयिताना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
हा 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आलिशान चारचाकी वाहनातून चोरून नेहला होता.या प्रकाराने आटपाडी शहरासह तालुक्यात भितीचे वातावरण पसरले होते.घटनेचे गांभिर्य ओळखून आटपाडी पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन चोरट्यासह बकरा ताब्यात घेतला आहे. आता पुढील प्रक्रिया सुरू आहे.