संकेत टाइम्सचे स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषा गौरव पुरस्कार

0



दौंड येथील स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषा गौरव पुरस्काराने सन्मानित केले. हिंदू सम्राट दैनिकाचे संपादक उत्तम कागले, पोलीस उपनिरीक्षक पालवे साहेब, ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, प्रदेश संघटक प्रा. दिनेश पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातील प्रख्यात स्तंभलेखक असून महाराष्ट्रातील सर्वच वर्तमानपत्रात ते नियमित लेखन करीत असतात. 











शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, कला, क्रीडा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे पाच हजारांपेक्षाही जास्त लेख विविध वर्तमानपत्र, नियतकालिके तसेच  दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेने त्यांना सन्मानित केले आहे. शाल, श्रीफळ, चषक व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  श्याम ठाणेदार यांच्यासोबतच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील 51 समाजसेवकांनाही सन्मानित करण्यात आले आहे. 


Rate Card








श्याम ठाणेदार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी दौंडचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सोहेल खान, काँग्रेसचे हरेश ओझा, मनसेचे सचिन कुलथे उपस्थित होते.



लेखक श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.