उमराणीत चौंरगी लढत मतदार यंदा भाकरी फिरवणार ? ; बाहुबलीना दणका शक्य

0
3



उमराणी वार्ताहर : उमराणी ग्रामपंचायतीचा रणसंग्राम सिगेला पोहचला असून निवडणूक चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस,शेतकरी संघटना,भाजप,काँग्रेस अशी चार पँनेल या निवडणूकीत उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहेत.चारी पँनेलच्या नेतृत्वाकडून उमेदवारीची जुळवाजुळव सुरू झाली आहे.









गेल्या पाच वर्षातील ग्रामपंचायत सत्तेतील एकाधिकार शाहीला वैतागलेले मतदार यावेळी कोणाला साथ देणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात आपला गाव सुद्धा त्यांना परका झाल्यासारखं होतं.आता याच नागरिकांना हाकलून देणाऱ्या नागरिकांची गावातील बहुर्चित अडेलटटू बाहुबलींना झाली आहे.निवडणूकीत मताचे महत्व जाणून असलेले हे स्वंयघोषित बाहुबलींना गावात पुढून गेला तरी लक्ष न देणाऱ्या व कोरोना काळात गावात आलेल्या गावातील नागरिकांची हेळसाड करूनही पुन्हा त्यांची आठवण आलेली आहे.








झाल गेलं, सगळ विसरून आमच्याबरोबर या म्हणून त्यांच्यापुढे पायघड्या घालतानाचे केविलवाने त्याचे रूप पाच वर्षानंतर रस्त्यावर प्रकटले आहे.निवडणुकीत आपल्या वार्डात उभे राहून आपले नशीब आजमावणार उमेदवार सध्या निवडणुकी पूर्वी एकेक मतांची जुळवाजुळव करण्याच्या बेरीजेत मग्न आहेत.इच्छुक उमेदवारांसह, पुढाऱ्यांकडून आता सगळ्याती आठवण काढली जात आहे.यासाठी कोण कुठे राहायला गेलेले आहे,किती जणांचे मतदान आपल्याला पडतील याचे नियोजन करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसत आहे.त्यासाठी त्यांच्या वाहतुकीचा खर्च सहित विविध आमिषे दाखविण्यात येत आहेत.









कोरोना काळात जीवाच्या आकांताने भीतीपोटी जत तालुक्यातील नागरिक पुणे मुंबई नागपूर इतरत्र शहरात नोकरी व्यवसायासाठी गेलेले आहेत.अचानक कोरोना महामारीने डोकेवर काढल्याने शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना एकदम गावची आठवण झाली.कुटुंबांना घेऊन ते गावाकडे आले परंतु कोरोनाच्याच्या भितीने अधिच हादरून गेलेल्या गावकऱ्यांनी गावात बाहेरच्यांना गावबंदी करत प्रवेश नाकारला.बाहुबलीच्या आदेशावरून रात्री-अपरात्री तरुणांनी गावाबाहेर खडा पहारा देऊन शहरातील येणाऱ्या लोंढ्यांना गावाबाहेर थांबले होते. आता याच छळ केलेल्या मतदार खरचं बाहुबलींना स्विकारणार का? कि भाकरी फिरवणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.सत्ताधारी गटाला धक्का देण्यासाठी आता मैदानात उतरलेले उमेदवार कितपत यशस्वी होणार हे 17 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here