रस्त्याकडेची झुडपे बनलेत मृत्यूचे सापळे | जत‌ेतील रस्ते व्यापले ; तातडीने झुडपे हटवा,श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेची मागणी

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अनेक गावांत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढले आहेत.या काटेरी झाडा, झुडपामुळे रस्ता तर अरुंद झालाच आहे त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.ही बाब गंभीर असताना ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याकडेची झाडे झुडपे वाढली आहेत ती काढण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी चिकलगी श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेनी केली आहे.

चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य प्रशांत कांबळे यांनी यांनी यांबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांना दिले आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात 120 गावे, वाड्या, वस्त्या आहेत. तालुक्यात बहुतांश सर्व गावांना जायला रस्ते आहेत. गावातून जाणारे रस्ते, वळणावरील रस्ते हे सध्या जतकरांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे, झुडपे वाढली आहेत. या वाढलेल्या काटेरी झाडा- झुडपामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. एखादे मोठे वाहन समोरून आले तर दुसरे वाहन तेथून जाऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर या अरुंद झालेल्या काटेरी झुडपामुळे अपघात वाढले आहेत.

Rate Cardग्रामपंचायतीना आदेश द्यावेत

तालुक्यातील रस्त्याकडेची झुडपे संबधित रस्त्यालगतच्या ग्रामपंचायतीकडून काढण्यात यावीत,त्यासाठी आपल्या स्तरावरून तसे स्वतंत्र आदेश काढावेत.एकादा नाहक जीव जाण्याअगोदर प्रशासकीय कारवाई करावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याकडेचे काटेरी झाडे, झुडपे काढा या मागणीचे निवेदन देताना तुकाराम बाबा महाराज, प्रशांत कांबळे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.