सातबाऱ्यावरील नावे बदलून मिळतील ? | तालुक्यात टोळीच‌ कार्यरत | कारवाई करा,स्वा.शेतकरी संघटनेचे निवेदन

0
3



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यातील अनेक गावात ऑनलाइन सातबारा दुरूस्तीच्या नावाखाली बोगस नावे घुसडले जात असून अशा काही गावातील दलाल,तलाठी,मंडल अधिकारी व ऑनलाइन सातबाराचे काम दिलेल्या यंत्रणेकडून मुळ वारस,वगळून थेट नात्यात नसलेल्या लोकांनी नावे चक्क सातबाऱ्यांवर नोंदविण्यात आली आहेत.अशा प्रकरणात तालुक्यात मोठे रँकेट कार्यरत असून महसूलची मोठी यंत्रणा यात गुंतली आहे.









पैसे मिळविण्यासाठी थेट शेतकऱ्यांची सातबाऱ्यावरील नावे उडविण्याचा गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत,असे सातबारा दुरुस्त करून संबधितावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी स्वा. शेतकरी संघटनेने केली आहे.तशा मागणीचे‌ निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले आहे.

जत तालुक्यात सातबारा ऑनलाइन करताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत.(या चुका झाल्या की केल्या याबाबत संशोधन करण्याची गरज आहे.)त्या दुरुस्त करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची थेट लुट करण्यात येत आहे.त्यावर कहर करत या यंत्रणाकडून थेट मुळ शेतकऱ्यांची नावे उडवून त्रयस्थ लोकांची नावे मुळ खात्यावर लावण्याचे प्रकार तालुक्यात अनेक गावात झाले आहेत. 








मुळात‌ लहरी निसर्गाचा सामना करत तालुक्यातील शेतकरी शेती करत आहे.अगोदरच दुष्काळी भाग म्हणून तालुक्याची ओळख आहे.निसर्ग,धान्यचे पडलेले दर,गरीबीचे‌ चटके खात शेतकरी कसेबसे ‌जीवन जगत‌ आहेत.परिस्थितीने 

व्याकुळ असलेले शेतकरी अनेक वेळा तलाठी कार्यालयाकडे फिरकत नाही.त्याचाच फायदा तालुक्यातील  ‌काही तलाठी,मंडल अधिकारी, दलालानी घेतला आहे.अनेक वर्षे शेतीचे‌ उतारे,कर न भरलेले सातबारे शोधून काढून त्यात‌ मागणी नसतानाही थेट नावे दुरुस्त करण्याच्या नावाखाली मुळ शेतकऱ्यांची नावे बदलून वेगळ्याच माणसाची नावे सातबारावर नोदविण्याचे प्रकार घडले आहेत. 







अशा थेट पुराव्यासह अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे दाखलही झाल्या आहेत.यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशा तक्रारी स्पष्ट होऊनही या भष्ट्र यंत्रणेविरोधात‌ कारवाई केलेली नाही.त्यामुळे तालुक्यात असे प्रकार सातत्याने घडत आहेत.निवेदनावर सुरेश घागरे,रमेश माळी,शिवानंद शिंदे,शिवाजी गडदे‌ यांच्या सह्या आहेत.









सातबारावर नावे घालणारी टोळी कार्यरत


जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दुरूस्ती,ऑनलाइनच्या नावावर मुळ शेतकऱ्यांची नावे वगळून थेट‌ तिसऱ्याच लोकांची नावे लावण्याचे प्रकार घडत आहेत.थेट महसूलचे काही तलाठी,मंडल अधिकारी व स्थानिक दलालाच्या अशा कामासाठी टोळ्या तालुक्यात कार्यरत आहेत.प्रत्येक महिन्याला तालुक्यात अशा अनेक घटना घडत आहेत.या प्रकाराला कोन पाठीशी घालतयं यांची चौकशी करण्याची आमची मागणी आहे.



सुरेश घागरे

स्वा.शेतकरी संघटना नेता





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here