लंडनहून दिल्लीत आलेल्या पाच प्रवाशांना कोरोनाची लागण | भारतातही खबरदारी
इंग्लंड : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडला आहे. सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे.त्यांचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे.
त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा धोकादायक आहे त्या पार्श्वभूमीवर भारतातही योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानाना बंदी घालण्यात आली आहे.तत्पुर्वी लंडनहून भारतात आलेल्या 266 प्रवाशांपैकी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.हे सर्व प्रवासी सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते.पाचही रुग्णांचे कोरोनाचे नमुने पुढील तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.दरम्यान अन्य देशातही मोठी खबरदारी बाळगली जात आहे.