जत,प्रतिनिधी: जत पश्चिम भागातील ताकतवान नेते,माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या नेतृत्वाखाली अंकले,कडणूर,धावडवाडी या गावात ग्रामपंचायत निवडनूकीत खतीब यांनी तयारी सुरू केली असून दोन्ही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळावी यासाठी आम्हचे प्रयत्न सुरू आहे.गावातील स्थानिक आघाडीची बोलणी सुरू आहेत.सर्व समावेशक उमेदवार देऊन निवडणूक लढवत आहोत यावेळी आमचे मोठ्या संख्येने उमेदवार निवडून येतिल असा आशावाद माझी भूमिका स्पष्ट करताना मन्सूर खतीब यांनी व्यक्त केला.
जत पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. बाजार समिती संचालक,पंचायत समिती उपसभापती,सभापती अशा अनेक पदावर कार्य केले स्वर्गिय सुनिल बापू चव्हाण यांचे जिवलग मित्र त्यांच्या पश्चात खतीब यांनी राजकीय संघर्ष कायम ठेवला आहे. कॉग्रेसमधून काही मुद्यावर न जमल्याने त्यांनी बाहेर पडत स्वंतत्र चूल मांडली आहे. गत जिल्हा परिषद निवडणूकीत अगदी काठावर विजयापासून दूर राहिलेले मन्सूर खतीब ग्रामपंचायत निवडनूकीत झाडून कामाला लागले आहेत.गत तीन तपापासून जत पश्चिम भागात त्यांचा समर्थक गट कार्यरत आहे.
सभापती असताना अनेक गावात त्यांनी केलेल्या विकास कामावर व भविष्यात सक्षम गावे बनविण्यासाठी ते पश्चिम भागातील ग्रामपंचायतीवर आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत आहेत.स्थानिक आघाडी जुळवून घेत आपली घौडदोड सुरू ठेवली आहे. डफळापूर परिसरातील सर्व गावात आम्ही विकास कामे केले आहेत.
डफळापूर सह सर्वच ठिकाणी भविष्यात गावे विकास पर्वात आणावयाची आहेत. त्यासाठी सुसंस्कृत्त, शिक्षित,अनभुवी उमेदवार निवडून आणून परिसरातील गावाचा कायापालट करायचा आहे. त्यामुळे आमच्या व्हिजनला जनतेनी साथ असे आवाहन खतीब यांनी शेवटी केले.