मोफत‌ हरभरा‌ डाळ रेशन दुकानात24 डिसेंबरपर्यत उपलब्ध ; सचिन पाटील

0जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारणेत आलेल्या लॉकडावून काळात योजनापात्र लाभार्थी यांना शासनाकडून माहे जुलै,ऑगस्ट,सप्टेबर,ऑक्टोबर 2020 करीता मंजूर करणेत आलेली मोफत हरभरा डाळ तालुकेतील गावचे सर्व दुकानदारांना तालुका शासकीय गोदामाकडून पोहच करणेत आलेली आहे. तरी तालुकेतील अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनापात्र लाभार्थी यांनी प्रति महिना, प्रती कार्डधारक ! किलो या प्रमाणात देय असणारी हरभरा डाळ आपले गावचे सरकारी धान्य दुकानदारांकडून तात्काळ प्राप्त करुन घ्यावी. 


तरी ज्या योजनापात्र लाभार्थी यांनी अद्यापी एकूण एकंदर महिन्याची मोफतची हरभरा डाळ प्राप्त करुन घेतलेली नाही. किंवा काही महिन्याची हरभरा डाळ प्राप्त करुन घेतली तर काही महिन्याची प्राप्त करुन घेणे शिल्लक आहे. Rate Card
त्यांनी दि.24 डिसेंबर 2020 या अंतिम देय मुदती अखेर प्राप्त करुन घ्यावी.सदरच्या मोफत डाळीचे वितरण इपॉस मशिन ट्रान्झेक्शनव्दारेच करणेच्या शासनाच्या सुचना असलेने दि.24 डिसेंबर या अंतिम वितरण मुदती नंतर कोणत्याही योजनापात्र लाभार्थी यांना मोफतच्या हरभरा डाळीचे वितरण होवू शकनार नाही, याची तालूकेतील योजनापात्र लाभार्थी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जत तहसिलदार श्री सचिन पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.