सावळजमध्येही खासदार गट पुन्हा तडा | अनेकांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश :
तासगाव : तालुक्यात खासदार संजय पाटील गटाला घरघर लागली आहे. तासगाव शहर, सावर्डे, कवठेएकंदसह आता सावळजमध्येही खासदार गट भेगाळण्यास सुरुवात झाली आहे. सावळज येथील अनिल थोरात, अरुण पाटील यांच्यासह अनेकजण उद्या (रविवारी) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सावळजमधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर खासदार गटाला तडे जाऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.

तासगाव शहरातील एक माजी नगराध्यक्ष, कवठेएकंद येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती, एका गावचे लोकनियुक्त सरपंच यांनी कालच खासदार गटाला रामराम ठोकून शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. या सर्वांचा आज ‘मातोश्री’वर सेना प्रवेश होणार आहे.