दिलासादायक | शेतकऱ्यांची जमिन बळकावू पाहणाऱ्या बेकायदा सावकार पुढाऱ्यांना पोलिसांनी दिला दणका

0
6



बारामती : बारामती शहर व परिसराततील राजकीय झूल पांघरलेल्या पुढाऱ्याला शहर पोलिसांनी पोलीसी हिसका दाखवत चांगलाच वठणीवर आणला.एका अगतीक गरीब शेतकऱ्याकडून सावकारी कर्जापोटी लिहून घेतलेली सुमारे तीन कोटी रुपयांची जमीन पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या शेतकऱ्याला पुन्हा परत मिळाली आहे. शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या सावकाराला दणका देत अन्य खाजगी सावकारांना इशारा दिला आहे.












बारामती परिसरातील एका प्रसिद्ध पुढाऱ्याने 2017 मध्ये नागवडेवस्ती येथे राहणाऱ्या एका शेतक-याला दहा लाख रुपये दहा टक्के व्याजाने दिले होते. संबंधित शेतक-याने महिन्याला लाख रुपये या प्रमाणे अठरा महिने पैसे दिल होते.तरीही हा पुढारी त्याच्याकडे अजून पाच लाखांची मागणी करत होता.पाच लाखापोटी त्याने बारामती बाजार समितीतील गाळा आपल्या नावाने लिहून दे म्हणून तो मागे लागला होता. सततच्या धमक्यांनी संबंधित शेतकरी वैतागला होता.पैसे दिले नाहीतर तुझ्या जमिनीवर आरक्षण टाकायला लावीन अशीही चेतावणी त्याने दिली होती. 










पो.नि.नामदेव शिंदे यांनी सावकारांविरुध्द उघडलेल्या मोहिमेच्या बातम्या वाचून संबंधित शेतक-याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.शिंदे यांनी कागदपत्र,परिस्थितीची तपासणी केल्यानंतर संबंधित सावकाराला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले.ठाण्यातही याद सावकारांनी आपले राजकीय बाहुबल दाखविण्यास सुरूवात केली,मात्र कर्तव्याशी प्रामाणिक असलेले शिंदे यांनी त्या भिक न घालता कारवाई सुरू केली.










कारवाईच्या भितीने जमिनीवर आलेल्या सावकारांने संबंधित शेतकऱ्यांची जमीन त्या शेतक-याला परत देण्याची तयारी दाखवली व जमीन  पुन्हा त्याच्या नावे करुन दिली.आजच्या बाजारभावाप्रमाणे या दीड एकरांची किंमत तीन कोटींच्या घरात आहे.दक्ष पोलीस अधिकाऱ्यामुळे हे शक्य झाले.संबंधित शेतकऱ्यांनी शिंदे यांचे आभार मानत कर्तज्ञता व्यक्त केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here