ग्रामपंचायत निवडणूक : वळसंगमध्ये तिरंगी लढत ?

0वळसंग,वार्ताहर : सन 2020 साली मुदत संपलेल्या ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली. जानेवारी 2021 मध्ये या निवडणुकीत रंग भरणार असल्याने आणि कमी वेळ असल्याने स्थानिक सर्व नेते व कार्यकर्ते मोर्चेबांधणीला कंबर कसून काम करताना दिसत आहेत. सप्टेंबर महिन्यात मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतवर कोरोनाचे संकट डोळ्यासमोर असताना कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमण्यात आले होते. कोरोनाचे संकट असताना शासनाच्या निर्णय प्रमाणे पुढील महिन्यात मतदान होणार आहे.

तर सर्व पक्षीय बल म्हणून सर्व तालुका नेते ग्रामपंचायतच्या निवडणूकीकडे लक्ष घालून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले वर्चस्व कसे मिळवता येईल या अनुषंगाने भेटी, गाठी, चर्चेला उधाण आले आहे. वळसंग ग्रामपंचायतची निवडणूक ही कायम उल्लेखनीय ठरलेली आहे. पक्षीय बलाबल, किंवा अत्यंत चुरशीची लढत म्हणून वळसंगच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. चव्हाण गट आणि पुजारी गटात आतापर्यत रंगतदार लढत पाहायला मिळाली पंरतू या निवडणूकीत तिसरी आघाडी निर्माण करून यंदाची लढत तिरंगी करण्याचे चिन्हे ठळक दिसत आहेत.


Rate Card
पुजारी आणि चव्हाण गटाच्या पक्षांतर आणि बालेकिल्ल्यात तिसऱ्या आघाडीची इन्ट्री होते का ? तिसरी आघाडी कोण करेल, यंदा जनता नवख्या चेहऱ्याला पसंदी देणार का? नवख्याना विकासासाठी संधी देण्याचा हेतू साध्य होईल का ? असे अनेक प्रश्नाबरोबर लढत रोमांचक होईल याकडे सर्व बड्या-लहान नेत्यांचे लक्ष असेल.  

गेली काही पंचवार्षिक निवडणूकित चव्हाण गटाने दिलेली जोरात टक्कर, आणि मागील निवडणुकीत पुजारी गटाच्या अनुभवाचा एक कमबॅक नक्कीच खूप काही शिकवून जाणारा आहे. तर गेली 4-5 वर्षे ग्रामपंचायतने केलेले राजकारण यात ठराव, अविश्वास ठरावं, पोटनिवडणुक यामुळे जनतेच्या मनात विकासाच्या प्रश्नासाठी प्रश्न चिन्ह असेल का ? 


पक्षांतर यात भाजप, राष्ट्रवादी गट मजबूत की काँग्रेस अबाधित ठेवलेल्या यशाचा मंत्र घेऊन कोण उतरणार, राष्ट्रवादी-काँग्रेस युती करणार का ? गटाच्या जोरावर लढणार ? का यंदा तिसरी आघाडी निर्माण होणार आहे त्याकडे जनतेचे कल असतील का ? युवा वर्ग, शिक्षित, खंदे समर्थक इ. वाढता कल काय असेल ?  अभेद बालेकिल्ला, अभेद वार्ड असणाऱ्या दोन्ही गटात पूर्वतत वचक राहणार का ? नवख्याना यंदा यश पदरात असेल असे अनेक रोमांचक प्रश्न तितकेच वळसंगची लढत ही रंगतदार होणार अशी सौम्य चर्चा ऐकायला मिळते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.