नव्या पदाधिकाऱ्यांचा 3 वर्षाचा कार्यकाल संपला | जत नगरपरिषद स्थापनेच्या 8 वर्षानंतरही प्रश्न,समस्या कायम | कधी होणार वचनपुर्ती

0जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या भोंगळ व ढिसाळ कारभारामुळे जत शहरवासियांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून सद्धस्थितीत जत शहरात डेंगूच्या साथीने थैमान घातले आहे.हा जतकरांसाठी धोक्याचा इशारा आहे.जत शहराची लोकसंख्या पन्नास हजार ओलांडून गेली आहे.शहरात सहाप्रभाग असून या सर्वच प्रभागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. जत शहरातील प्रमुख रस्ते हे नावापुरतेच असून या रस्त्यावरील डांबर गायब झाले आहे.


रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याचे बाजुला असलेली गटारे जागोजागी तुंबलेने या गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे.त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.जत नगरपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधी नगरसेवकामध्ये नगरपरिषदेचे मासिक सभेमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होऊन ते प्रकरण मारामारी पर्यंत जात असल्याने जत शहराचा विकास करण्याची जबाबदारी जत शहरवासियांनी ज्या नगरसेवकाकडे सोपविली आहे.


तेच प्रतिनिधी असे वागत असतील तर अशा जनतेच्या प्रतिनिधीकडून लोकांनी काय आदर्श घ्यावा. हे असेच चालू राहिले तर जत शहराचा विकास करण्याऐवजी हे नगरसेवक जत शहर भकास केल्याशिवाय राहाणार नाहीत.जत नगरपरिषेदेला आठ वर्षे पुर्ण झाली आहेत.नव्या निरोधक, सत्ताधाऱ्यांचाही तीन वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे.मोठ्या गर्जनेने नागरिकांचे हित पहाण्याच्या वल्गना केलेल्या सत्तेतील व विरोधी नगरसेवकांनी खऱ्या अर्थाने नागरिकांचे किती प्रश्न,समस्या सोडविल्या हा संशोधनाचा मुद्दा आहे. मात्र सत्तेतील असूदेत किंवा विरोधातील नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या अधिकारी व प्रशासनाच्या हिशोबाने कारभार स्पष्ट केल्याचे स्पष्ट आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांकडे भूमिकाच नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी कामाचे ठेके घेण्यात धन्यता मानत असल्याचे आरोप होत आहेत.शहरातील सर्वच प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत.विशेष म्हणजे जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा या महिला असतानाही जत शहरामध्ये महिला वर्गासाठी पुरेशा प्रमाणात शौचालय व स्वच्छतागृहे नाहीत. जत बाजारपेठेत तर महिलासाठी भाजीपाला खरेदी करण्यासाठी तसेच अन्य कारणासाठी गेल्यास त्या महिलांना स्वच्छतागृहाअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते याची जाणीव महिला नगराध्यक्षा यांनी ठेवली पाहिजे. 

Rate Cardजे नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.त्यांना नगरसेवकाची कर्तव्य काय व जबाबदारी काय असते हे सांगण्याची वेळ आली आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर रस्त्याचे कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.या अतिक्रमणामुळे जत शहर विद्रूप दिसत आहे.जत नगरपरिषदेने जत शहरात अबालवृद्धांना समाधान वाटेल असे कोणतेही उपक्रम राबविले नाहीत. जत शहरात जत सांगली मार्गावर श्री.छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची जागा असूनही या ठिकाणची अवस्था भकास झाली आहे.नगरपरिषदेचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. 

जत शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेला किड लागली असून जत शहरवाशियांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली ही यंत्रणा जत शहरवासियांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा करण्याचे काम करित आहे.
पाणी पुरवठा यंत्रणेमार्फत शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या जलनिस्सारण केंद्रात टि.सी.एल पावडरऐवजी चुन्याचा वापर करून जत नगरपरिषद जत शहरवासियांच्या  जिवाशी खेळत आहे.सद्या जत शहरात डेंगूच्या साथीने थैमान घातले आहे. शहरातील ओढे, नाले, गटारी तुंबल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.शहरात मोठ्या प्रमाणात डासांची संख्या वाढली आहे. एवढे होऊनही जत नगरपरिषद व आरोग्य विभागाने याची दखल घेतली नाही. डेंग्यू झालेले लोक मिरज व सांगली तसेच जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याची कल्पना जत नगरपरिषदेला असतानाही जत नगरपरिषद याकडे गांभीर्याने पहाण्यास तयार नाही.डेंगूच्या साथीने जत शहरवासिय भयभीत झाले असतानाही जत नगरपरिषदेकडून या साथीविषयी कोणतीही जनजागृती किंवा उपाययोजना करण्यात आली नाही हे जत शहरवासियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 


जत नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाले आहेत.परंतु सबंधित शेताच्या मालकानी प्लाॅट पाडतेवेळी हे नैसर्गिक नाले पूर्णपणे मुजविल्याने नैसर्गिक नाले वाहण्यासाठी स्त्रोतच नसल्याने शहरात जागोजागी हे नाले मुजविल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत असलेचे पहावयास मिळत आहे.हे मुजविलेले नाले पुर्ववत वाहते करण्यासाठी नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने पाहीले पाहीजे. पण नगरपरिषदेला त्याचे काहीही देणे घेणे नाही. त्यामुळेच जत शहरात वरचेवर साथीचे आजार डोके वर काढत आहेत.याला सर्वस्वी जत नगरपरिषदेचा अनागोंदी व भोंगळ व ढिसाळ कारभारच कारणीभूत आहे.भानगडीसाठी संमातर कार्यालय


जत नगरपरिषदेत सोयीच्या भानगडी करण्यासाठी मुख्य इमारतीतील महत्वाचे अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी पाण्याच्या टाकीजवळ संमातर कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.तेथे नगरपरिषेदेचे महत्वाचे अधिकारी ठाण मांडून असतात.आर्थिक व्यवहारही येथून केले जात असल्याचे आरोप आहेत.तेथे नगरपरिषदेचे सत्ताधारी व विरोध नगरसेवकांचा तेथे असणारा वावर अनेक भानगडी स्पष्ट करणारा आहे.नेमके मुख्य कार्यालय सोडून हे संमात्तर कार्यालय कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.जत शहरातील नाल्याची झालेली बकाल अवस्था,अतिक्रमणाचा विळखा चित्र बदलणार काय?

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.