10 महिने रखडलेली जमीन नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांचे जतेत उपोषण
जत,प्रतिनिधी :खरेदी केलेल्या जमीनीची जतच्या सर्कलने सुडबुध्दीने नोंद केली नसल्याच्या निषेधार्थ जत येथील लक्ष्मण यंशवत कोळी यांच्या कुंटुबियाच्या वतीने सुरू केलेले उपोषण प्रांत प्रंशात आवटे यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.
लक्ष्मण कोळी यांनी त्यांच्या भावाची गट नं.327 मधील जमीन 17/1/2020 रोजी खरेदी करून दस्त20/1/2020 रोजी गावकामगार तलाठी यांच्याकडे रितसर नोंद करण्यासाठी दिला आहे.
तेथे तलाठी यांनी 7/12 ला नोंद करत दस्त क्रमांक 175 अन्वय झालेल्या दस्ताची फेरफार नंबर 1578 ही नोंद धरण्यात आली होती.त्यानंतर जत सर्कल यांनाही दस्त नोंदीसाठी देण्यात आला होता.या नोंदीवर सुभाष कोळी यांची तक्रार आहे,म्हणूनजत सर्कल संदिप मोरे यांनी 11/3/2020 रोजी पुराव्यानिशी हजर राहण्याचे नोटीस दिले होते.मात्र त्या दिवशी सर्कल अथवा तक्रार सुभाष कोळी हे दिवसभर कार्यालयात हजर झाले नाहीत.

तक्रारदार सुभाष कोळी यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही.जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने या टोळीकडून हा बनावट बनाव रचला जात आहे.त्यांची चौकशी करून मला नोंद करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.