डफळापूरातील पेयजल योजनेच्या नळ जोडण्या गतीने
जत,वार्ताहर : मी सभापती असताना स्वर्गीय सुनिलबापू चव्हाण व मी डफळापूरसाठी कायमस्वरूपी पाणी देण्याचे स्वप्न बघितले होते.ते आज पत्यक्षात उतरत आहे.बापूच्या आकाली निधनानंतर योजना पुर्ण करण्याचे आवाहन आमच्या समोर होते.ते आम्ही पुर्ण केले आहे,असेही मन्सूर खतीब यांनी सांगितले.
जत तालुक्यातील मोठे गाव असलेल्या डफळापूरची पाणी टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता होणार आहे.बहुचर्चित पेयजल पाणी योजनेचे काम पुर्णत्वाकडे आल्याने पुढील एक दोन महिन्यात डफळापूर कराना शुध्द, मुबलक व उच्च दाबाने पाणी मिळणार आहे.

योजनेचे बसाप्पावाडी तलाव नजिकची विहिर,तलाव ते एकविरा माळावरील टाकी,गावभाग,वाड्यावस्त्यापर्यत पाईपलाईन,दाबनलिका,उंच टाक्या,शुध्दिकरण यंत्रणा,अतर्गंत कामे पुर्ण झाली आहेत.सध्या ग्रामपंचायतीकडून गाव भागातील नळजोडण्या सुरू आहेत.हेही काम लवकरचं पुर्ण करण्यात येणार आहे.
त्यानंतर दररोज शुध्द,उच्चदाब,मुबलक पाणी सोडण्यात येणार आहे. मोठ्या अडचणीनंतर सर्व पक्षीय नेते,ग्रामपंचायत,पाणी पुरवठा समितीच्या सहकार्याने योजनेचे काम पुर्ण करण्यात आले आहे. यापुढे असेच सहकार्य नागरिकांनी करावे,असे आवाहन माजी सभापती मन्सूर खतीब,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी सांगितले.