आंवढीत बंदीनंतरही दारू विक्री | महिलांचे निवेदन ; स्थानिक पोलीसांचे साटेलोटेचा आरोप

0
6



आंवढी,वार्ताहर : आवंढी ता.जत येथे दारू बंदीसाठी मतदान घेत दा रू बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असतानाही पुन्हा गावात आदेश डावलून अवैध दारू विक्री सुरु करण्यात आली आहे.याप्रकार निंदनीय असून यामुळे जत पोलीसांच्या निष्क्रियता स्पष्ट होत आहे,तात्काळ ही दारू विक्री बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंवढीतील महिलांनी दिला आहे.








निवेदनात म्हटले आहे की,आवंढी येथे 

मोठ्या प्रमाणात सुरू असलेली देशी,विदेशी,गावटीअवैध हातभट्टीची दारू विक्रीमुळे अनेक कुंटुबे उदधस्त होत होती.याप्रकाराने गावातील शांतता भंग होत होती.अनेक गोरगरिब,मजूरांच्या कुंटुंबात वारवांर भांडणे होत होती.त्या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्र येऊन 2018 मध्ये दारूबंदी विरोधात उठाव केला.गावतील संपूर्ण दारूबंदी होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क सांगली जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली दि.6/1/2019 रोजी आवंढी मध्ये दारू बंदीसाठी गावातील महिलांचे गुप्त मतदान घेण्यात आले होते.या मतदान प्रक्रियेत एकूण 742 महिलांनी मतदान केले.









त्यापैंकी 659 महिलांनी दारूबंदीसाठी मतदान करत बाटली 

आडवी करून दारूबंदीविरोधातील लढाई जिंकली होती.दि.19/01/2019 रोजी जिल्हाधिकारी सांगली यांनी (सी.एल.आर.112018/4327)या आदेशानुसार गावामध्ये कायमस्वरूपी दारू बंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर काहीकाळ गावात दारू बंदी झाली होती.









मात्र काही महिन्यातच काही समाजकंटकांनी गावातील कायदा व

सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने पुन्हा दारू विक्री सुरू केली आहे. 

याबाबत जत पोलीसांना अनेकवेळा दारू विक्री सुरू असलेबाबत माहिती दिली होती.मात्र जत पोलीसांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.स्थानिक पोलीसांचे या अवैध व्यवसायिकांशी साटेलोटे असल्याने दारू विक्रेते थेट बंदी असतानाही उघड्यावर दारू विकून कायदाचा भंग करत आहेत.हा प्रकार निंदनीय आहे.तात्काळ दारू बंदी करावी,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिला आहे. 









निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांत,जिल्हा पोलीस प्रमुख,जत पोलीस ठाणे येथे दिले आहे.यावेळी संगिता कोडग,कांचन कोडग,रत्नाबाई कोडग,मालन कोडग,अनुसया कोडग,द्रोपती कोडग,सुनीता वाघमारे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या.










आंवढीत बंदीनंतर सुरू असलेली दारूविक्री तात्काळ बंद करा या मागणीचे निवेदन देण्यात आले.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here