संख,करजगीतील रेशन दुकानाचे परवाने रद्द करा | प्रहार अपंग क्रांती संघटनेचा‌ आंदोलनचा‌ इशारा

0



जत‌,प्रतिनिधी : मौजे संख येथील सी.जि.बालगाव व मौजे करजगी येथील अशोक रेवणसिद्ध जेऊर या शासनमान्य रेशन दुकानदाराचे परवाने रद्द करावेत,‌अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि,

मौजे संख व करजगी ता.जत जि.सांगली येथील सी.जि.बालगाव व अशोक रेवणसिद्ध जेऊर हे दोन्ही दुकानदार बेकायदेशीर पणे चालवत असलेची तक्रार अप्पर तहसीलदार संख यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली होती.









त्यावरून पुरवठा निरक्षक श्री.भडके यांनी सदर दुकानांची तपासणी व पंचनामे केले‌ आहेत.

संख‌ येथील दुकानदार बालगाव हे प्रत्येक कार्डधारकांना 5 ते 10 किलो धान्य कमी देतात,‌कार्डधारकांना दमदाटी,धकाबुक्की करतात.याबाबत तक्रारीवरून जवळपास 100 कार्डधारकांचे जबाब घेण्यात आले आहेत. करजगी येथील अशोक रेवणसिद्ध जेऊर यांनी बाहेरून आणलेले खोबरेल तेल,चहा पाऊडर,निरमा साबण अशा अनेक वस्तू कार्ड धारकांना सक्तीने विक्री करत आहेत.








Rate Card



त्या वस्तू घेतले शिवाय रेशन धान्य मिळणार नाही व मी देणार नाही असे शब्दात ग्राहकांना

घमकावून माल वाटप करतात,तसे होत असताना काही कार्डधारकांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकार्ड करून घेत तसे ते पुरावे सादर केले आहेत. अप्पर तहसीलदार यांनी याबाबतही केलेला पंचनामा व 60 ते 70 हून अधिक कार्ड धारकांनी दुकानदाराच्या विरूद्ध जबाब दिले आहेत.एवढे सगळे पुरावे,कार्ड धारकांच्या तक्रारी,शासनाच्या विभागाचे पंचनामे होऊनही संबधित ‌दुकानदार बेकायदेशीर पणे आजही मनमानी कारभार करून दुकान चालवत आहे.








दोन्ही दुकानदारावर गंभीर स्वरुपाची कार्यवाही करून दुकान परवाना रद्द न करता जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वसुंधरा बारवे यांनी दोन्ही दुकानदारांना पाठीशी घालत असून असे जर कायदा सुव्यवस्था दुकानदाराच्या बाजूने असेल तर आम्ही कदाचित हे सहन करणार नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरूद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद धरणे आंदोलन करू असा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा,तालुका युवा अध्यक्ष भिमाशंकर बिराजदार,राजकुमार बिरादार,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत करजगी सामाजिक कार्यकर्ते सायबणा ककमरी,ज्ञानेश्वर बमनाळे उपस्थित होते.









संख,करजगीतील रेशन दुकानाचे परवाने रद्द करा,मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.