रामपूरनजिकच्या पूलाची उंची वाढण्याची मागणी

0जत,प्रतिनिधी : जत-डफळापूर मार्गावर रामपूर नजिक प्रतिभा डेअरी जवळच्या पुल धोकादायक बनला असून तातडीने पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.गेल्या अनेक वर्षापुर्वी पुलाचे बांधकाम झाले आहे. दोन्ही बाजूचा रास्ता तब्बल सात-आठ फुट उंच असतानाही पुलाची उंची तत्कालीन उंटावरून शेळ्या राखणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नैसर्गिक परिस्थिती न बघता कमी उंचीचा पुल बांधला आहे.परिणामी पावसाळ्यात अनेकवेळा पुलावरून पाणी वाहत असते.

त्यामुळे अनेकवेळा वाहतूक खोंळबते.आता पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.पुलावरील डांबरीकरण वाहून गेले आहे.संरक्षक खांबचीही पडझड झाली आहे.त्यामुळे पुलावरून धोका पत्करून वाहने चालवावी लागत आहे.रात्रीच्या वेळी वाहने ओढापात्रात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आता हा रस्ता प्राधिकरण विभागाकडे गेल्याने रस्त्याचे दर्जेदार करण्याची गरज आहे.


Rate Card

जत : रामपूरनजिकचा पूलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.