उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील सोन्याळ गावामध्ये विवाहितेचे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी ही घटना घडल्याचे समजते. पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुवर्णा प्रभाकर कावडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.(वय 22 रा.मुळ हळ्ळी) असे या विवाहित महिलेचे नाव आहे.
सोन्याळ गावापासून जवळ असलेल्या मलकाप्पा पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून या महिलेने आत्महत्या केल्याचे समजते. या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. या महिलेचा विवाह हळ्ळी येथील युवकाशी काही दिवसापूर्वी झाले होते. काही दिवसापासून ती माहेरी(सोन्याळ)येथे राहत होती.
चुलत भावाला मोबाईलवरून संपर्क साधून आत्महत्या करत असल्याचे सांगून आपले जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास स.पो.नि. दत्तात्रय कोळेकर व उमदी पोलीस कर्मचारी करत आहेत.