उमदी जिल्हा परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्याचे प्रयत्न

0उमदी,वार्ताहर : उमदी जिल्हा परिषदचे सदस्य आ.विक्रमसिंह सावंत हे विधानसभा निवडणूक लढवून विजय झाले.जिल्हा परिषदेची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक होणार होते. कोरोना या महाभयंकर संकटाने निवडणूक होऊ शकले नाहीत.डिसेंबर मध्ये मतदार याद्या पूर्ण झाल्यावर जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष निवडणूक होऊ शकणार आहे.दरम्यान जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी एक ते दीड वर्ष शिल्लक असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे.
उमदी जिल्हा परिषद जागेवर निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे येत्या काही दिवसात निश्चित होणार आहे.त्यामुळे मतदार संघातील इच्छुकांनी आतापासूनच प्रचाराची तयारी सुरू केली असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे नेते अँड.चन्नाप्पा होर्तीकर, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला राष्ट्रवादीतून तयारी करताना दिसत आहेत.भाजपचे युवा नेते संजय तेली व बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी हे भाजपमधून तयारीत आहेत.Rate Card


काँग्रेसकडून निवृत्ती शिंदे,बंडा शेवाळे,उपसरपंच रमेश हळके,संतोष आरकेरी आदी इच्छुक आहेत.काँग्रेस,राष्ट्रवादी,भाजप मध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना अशी आघाडी सरकार सत्तेवर असल्याने उमदी जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढविणार की स्वतंत्र यावर भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.