घाणीचे साम्राज्य ; डेंगू सदृष्य रूग्ण वाढले | नगरपरिषद,ग्रामपंचायती,आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

0जत,वार्ताहर : जत शहरासह तालुक्यांमध्ये डेंगू सदृश्य आजाराने आपले डोके वर काढले असून लहान बालकांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण एकदम घसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. या आजाराबाबत आरोग्य विभागात संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

जत शहरांमध्ये दहा ते बारा जणांच्या रक्तातील पेशीचे प्रमाण कमी झाल्यामुळे ते सांगली येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याची चर्चा होत आहे. बागेवाडी येथेही डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. डेंगू सदृश्य उद्भवणाऱ्या आजाराबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.एकीकडे कोरोना महामारी संक्रमणामुळे नागरिक हादरले असून परिस्थितीनुसार त्यावर उपाययोजना म्हणून तोंडावर मास्क लावणे सामाजिक अंतरचे पालन करून आपले स्वतःची सुरक्षा करीत आहेत.


मात्र कोरोना संक्रमणाचे नावावर स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभाग आपले कर्तव्य विसरत असून स्वच्छता,डांसाची उत्पत्ती, डेंगू साथीकडे याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जत शहरासह तालुक्यांमध्ये डेंगू,मलेरिया तापाने नागरिक फणफणत आहेत.याची कारणमीमांसा शोधली असता शहरासह ग्रामीण विभागांमध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक नाल्यांची साफसफाई होत नाही.


Rate Card

तसेच परतीच्या पावसामुळे ठीक ठिकाणी घाण पाण्याचे डबके साचल्यामुळे त्या डबक्यामध्ये डेंग्यूच्या मच्छरांचा सूक्ष्म जीवाणू तयार होत असून त्यामुळे डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली असून त्यामुळे नागरिकांना हे मच्छर चावल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तातील पेशींचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे डेंगू सदृश्य आजाराची लक्षणे दिसत असल्याने

नागरिकांमध्ये दहशत व्यक्त होत आहे. 

वास्तविक पाहता शहरांमध्ये आणि तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जत नगर परिषद,जत पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी स्वच्छता राखण्याची जबाबदारी पाळण्याची आवश्यकता आहे.मात्र स्वराज्य संस्थांनी नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले असून शहरासह तालुक्यामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात ओढ्यात आणि उघड्यावर सहज शौचक्रिया करीत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

नगरपरिषद अंतर्गत शहरांमधील कचरा नियोजन करण्यासाठी घंटागाडी

घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे,तर शहरांमधील कचरा उचलण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर महिन्या काठी लाखो चा खर्च केल्या जात आहे. सदर

कचऱ्याचे नियोजन आणि घनकचरा व्यवस्थापन हे वांझोटे ठरले असून याला कमिशन खोरीचे ग्रहण लागल्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लावला गेला आहे. शहरांमध्ये गेलेली गंधर्व नदी तसेच तालुक्यातील नदी नाल्या सह उघड्यावरील शौचक्रिया बंद करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती कागदावरून प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याची गरज आहे.तसेच शहरांतील आणि ग्रामीण विभागातील ठिकठिकाणी मच्छर आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करण्याची आवश्यकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.