रस्त्यावरील झुडपांमुळे रहदारीस अडसर

0
1



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात आले. तालुक्यात अशा अनेक मार्गालगत झुडपे वाढली असून, ती रहदारीस अडसर ठरत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. याकडे सार्वजिक बांधकाम विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे.



तालुक्यात अनेक राज्य,जिल्हा,गावाचे मार्ग माेठ्या प्रमाणात झुडपे व गवत वाढले आहे.दिशा दर्शक फलक, मैलाचे दगड सुद्धा त्यात गडप झाले आहेत. वळणावर समाेरून येणारे वाहन व्यवस्थित दिसत नसल्याने अपघात हाेत आहेत. 




अनेक खड्ड्याच्या राेडवल पॅचेस भरण्याचे साैजन्यही बांधकाम विभागाने अद्याप दाखविले नाही. त्यामुळे सर्वच रस्ते अपघातास कारणीभूत ठरत आहे.अनेक रस्त्याची कामे कंत्राटदाराने मध्येच साेडून पळ काढला असून, नागरिकांनी या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा आराेप करीत चाैकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here