बागेवाडीत डेंगू सदृश आजाराचे रुग्ण | तात्काळ उपाययोजना करा ; संजय कांबळे

0



जत,प्रतिनिधी : कोरोनाचे पार्श्वभूमीवर जत तालुक्यात डेंगूच्या रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासन व आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे व यावर त्वरित उपाययोजना राबविणे गरजेचे आहे,अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आयु संजयरावजी कांबळे यांनी केली आहे. 





कांबळे यांनी म्हटले आहे की, जत तालुक्यात मध्यंतरी झालेल्या पाऊसामुळे सर्वच गावागावामध्ये अस्वच्छता वाढल्याने व त्यातच डेंगूच्या डासांची उत्पत्ती ही मोठ्या संख्येने वाढल्याने तालुक्यात डेंगूच्या रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. 







Rate Card

डेंगूचे डास चावल्याने रूग्णांना ताप येणे,थंडी वाजून हुडहुडी भरणे, शरीरातील रक्तातील  पांढरे पेशी कमी होऊन रूग्णाला अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत.डेंगूचे साथीचा जास्त त्रास वयोवृद्ध लोकांना होत असून त्यांचा जिव अर्धमेला होत आहे. खासगी दवाखान्यात या रूग्णांवर उपचार करण्यात येत असलेतरी रूग्णांवर होणारा खर्च ही वाढत आहे. ज्या रूग्णांच्या शरिरातील रक्तातील पांढरे पेशी कमी झाले आहेत अशा रूग्णांना रक्तदाते शोधून त्याचे रक्त प्लेटलेटस माध्यमातून शरिरात घालावे लागत आहे.




तसेच येथील खासगी लॅबोरेटरीमध्ये वरचेवर रूग्णांची प्लेटलेटस तपासावी लागत आहे. यामुळे डेंगूच्या रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठी ओढाताण होताना दिसत आहे.तालुक्यातील बागेवाडी गावात डेंगूची लागण झाली असून गावातील पाचसहा लोकांना डेंगू झाला आहे. यामध्ये ब्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्धाचा ही समावेश आहे. त्यांच्यावर एक आठवडा झाला शहरातील एका खासगी हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.




तालुक्यात कोरोना बरोबरच डेंगूच्या साथीची लागण होत असल्याने डेंगूचे रूग्ण त्रस्त झाले असून जत तालुका आरोग्य विभागाने डेंगूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन सर्वे करावा व ही साथ मोठ्या प्रमाणात पसरणेपूर्वीच त्यावर नियंत्रण आणावे,असे आवाहन ही कांबळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.