आष्ट्यात सव्वा तीन लाखाचा गुटखा‌ जप्त

0आष्टा : आष्टा‌ ते‌ तासगाव रोडवर बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या अँपे रिक्षा पकडत 3,लाख,88 हजार,600 रूपयाचा गुटखा जप्त केला.याप्रकरणी राजू बाशेखान रोडे,वय 40,रा.मिलाळवाडी आष्टा या संशयिताना ताब्यात घेतले आगे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अवैध्य धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे.


 हे पथक आज इस्लामपुर विभागात पेट्रोलींग करीत असताना सहाय्यक फौजदार मारुती सांळुखे यांना आष्टा ते तासगाव रस्त्यावर एका ऍपे रिक्षामधून सुंगधी तंबाखु व गुटखा वाहतूक केली

Rate Card

जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तात्काळ आष्टा ते तासगाव रस्त्यावर तत्काळ सापळा रचला.काही वेळातच ऍपे रिक्षा (एमएच 10 सीक्यु 301) तेथे आली.रिक्षा थांबवून चालकाची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव राजु

रोडे असे सागितले. 
रिक्षाची तपासणी केल्यानंतर आतमध्ये सुंगधी तंबाखु, गुटखा सुपारी असलेली 12 पोती,आरएमडी पानमसाला 2 बॉक्स, सुंगधी तंबाखू गोल्डचे दोन बॉक्स असा 3 लाख 3 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल मिळाला. सुगंधी तंबाखू, गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरेली रिक्षा असा 3 लाख 88 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.मुद्देमालाचा पंचनामा करून आष्टा पोलीस ठाण्यात रोडे आणि मुद्देमाल देण्यात आला. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.