भाजपाच्या पदवीधर,शिक्षक उमेदवाराच्या‌ प्रचारार्थ डॉ.रविंद्र आरळी यांच्या सिनर्जी हॉस्पिटल येथे बैठक

0जत,प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सिनर्जी हॉस्पिटल येथे  पदवीधर व शिक्षकांची बैठक घेण्यात आली. यावेळी दोन्ही उमेदवारांना 1 क्रमांक पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री तथा भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक गणेश माळी, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, डॉकटर रवींद्र आरळी, भाजपा मिरज शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी सिनर्जी हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉक्टर खिलारे, प्रदेश किसान मोर्चा सचिव रोहित चिवटे, नंदकुमार कोरे तसेच पदवीधर व शिक्षक मतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबासाहेब आळतेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन भाजपा नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी केले.
Rate Cardमिरज येथील सिनर्जी हॉस्पिटल येथे भाजपचे‌ पदवीधर,शिक्षक मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ बैठक झाली.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.