जत पश्चिम भागात दुकानदारच पळवताहेत राशन | कोरोनाच्या काळात रेशनचा काळाबाजार ; 30 टक्के धान्ये गायब

0जत,प्रतिनिधी : केंद्र,राज्य शासनाकडून स्वस्तधान्य दुकानातून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशनवरील धान्य देण्यास सुरवात केली आहे. तसेच पाच किलो प्रतिलाभार्थी मोफत तांदुळही दिले आहे.पण रेशनचे हे धान्य खरोखरच लाभार्थ्यापर्यंत पोहोचते का, हा संशोधनाचा विषय आहे. रेशनमधील गहू, तांदूळ आणि इतर गोष्टी सामान्य जनतेपर्यंत धान्य वाटप सुरू आहे. परंतू हे सर्व होत असताना काळे धंदे करणारेे

स्वस्तधान्य दुकानदार पुरवठा शाखेतील अधिकारी,स्थानिक नेते,समित्यांना हाताशी धरून रेशनवरील गहू आटा मिलपर्यंत पोहोचवून काळाबाजारात विकण्याचा प्रकार होत आहे.
जत पश्चिम भाग अशा तस्करीचे केंद्र बनले असून गेल्या आठ महिन्यात आलेल्या धान्यापैंकी तीस टक्के धान्ये कार्डधारकांना न देताच दुकानदारांनी काळ्या बाजारात विकल्याची चर्चा आहे.पश्चिम भागातील डफळापूर, बेंळूखी,बाज,अंकले,डोर्ली,कुडणूर,शिंगणापूर,जिरग्याळ, शेळकेवाडी,एंकुडी,खलाटी,मिरवाड आदी गावातील रेशनकार्ड धारकांच्याकडे स्वतंत्र समिती नेमून तपासणी करावी अशी मागणी होत आहे.कोरोनाच्या साथीने राज्यासह देशात थैमान घातले आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय अधिक कडक केले आहेत. Rate Card

कोणीही घराच्या बाहेर न येण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. त्यामुळे गरीब व हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य लोकांना एकवेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले होते,अशा वेळेत केंद्र व राज्य सरकारकडून गरीब,बेरोजगार नागरिकांना पोटाचे हाल होऊ नये म्हणून मोफत,व कमी दरांने गहू,तांदुळ,डाळीचे वाटप केले होते.मात्र अनेक दुकानदारांनी गरिबांच्या धान्यावर डल्ला मारल्याचे स्पष्ट होत आहेत. तर या सर्व प्रकाराला तालुका पुरवठा विभागाचा थेट पाठिंबा असल्याचे आरोप आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.