ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे उद्घाटन | पालकाच्या संमतीपत्रासह जुनिअर कॉलेजची सुरुवात
येळवी,वार्ताहर : येथील ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था संचलित ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा उद्घाटन सोहळा चिक्कलगी मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकाराम महाराज तसेच जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, जत तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजना शिंदे,ज्येष्ठ नागरिक मा. पंचाक्षरी अंकलगी यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ अंकलगी, येळवीचे सरपंच कुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी,राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील अल्पसंख्यांक अध्यक्ष नजीर भाई शेख मा. दऱ्याप्पा जमदाडे,सेवानिवृत्त आर.टी.ओ शिवाजी माने,खैरावचे सरपंच राजू घुटुकडे, रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मा रेवे,
संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील,मारुती मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या संमतीपत्रसह येथे यावर्षीपासून ज्यूनिअर विभाग सुरू करण्यात आला आहे.परिसरातील विद्यार्थ्यांची यामुळे चांगली सोय होणार आहे.
ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.