जत तालुक्यात रेशनचे निम्मे धान्य काळ्या बाजारात

0
3





जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात जतच्या महसूल विभाग,व पुरवठा विभागाचे सोयीस्कर दुर्लक्षामुळे जत तालुक्यात केंद्र व राज्य सरकारकडून गरिबासाठी आलेल्या धान्यावर रेशन दुकानदाराकडून डल्ला मारत गरिबांच्या तोंडातून धान्य काढून काळ्या बाजारात विकले जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे.कोरोना लॉकडाऊनच्या एप्रिल  महिन्यापासून अडचणीतील गरीब नागरिकांना केंद्र सरकारकडून मोफत मोठ्या प्रमाणात गहू,तांदुळ देण्यात आला आहे. तो आजतागायत दिला जात आहे.मोठ्या प्रमाणात आलेले हे धान्य रेशन दुकानदारासाठी प्रवणी ठरले आहे.







आधारकार्ड नाही,मशिन अंगटा घेत नाही,माणसे कमी आहेत.कमी धान्य आले आहे.मोफत बंद झाले आहे.रेशनकार्ड अन्नसुरक्षा,अंत्योदय यादीत नाही,अशी सोयीस्कर कारणे देत हाजारो किलो गहू,तांदुळ,डाळीचे वाटप रेशन दुकानदाराकडून केले जात नाही.दुसरीकडे तालुका प्रशासनाकडून थेट कार्डनुसार रेशनदुकानदारांना धान्याचा पुरवठा होता.तरीही गावागावातील स्वस्तधान्य दुकानदाराकडून गरिबांचा छळ करून वाचविलेले गहू,तांदुळ थेट काळ्या बाजारात विकले जात आहे.तालुक्यात वितरित होणाऱ्या पन्नास टक्के धान्यावर रेशन दुकानदार डल्ला मारत असल्याचे आरोप आहेत.







आंवढी,बिळूर,करजगी,दरिबडची,बनाळीतील कारवाईनंतर ते स्पष्टही झाले आहेत.तालुका पुरवठा विभागाकडून या प्रकारावर कठोर कारवाई करण्याची गरज असताना तालुक्यातील अधिकारी तुंटपुज्या हव्यासापोटी अशा भष्ट्र रेशन दुकानदारांना पाठीशी घालत आहेत.परिणामी एककीडे गरिबांचे अन्नावाचून हल्ला होत असताना त्यांच्या तोंडातून काढलेले धान्य काळ्या बाजारात विकून रेशन दुकानदार,संबधित अधिकारी गब्बर होत आहेत.








स्वतंत्र त्रयस्त अधिकाऱ्यांच्या समितीकडून तपासणी करा


जत तालुक्यात गरीबीचा स्तर मोठा आहे.त्यामुळे अंत्योदय,अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत.केंद्र,राज्य शासनाकडून या कार्डधारकांना कमी किंमतीत,कोरोना काळात मोफत धान्य देऊन आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र तालुक्यातील भष्ट्र अधिकाऱ्यांची साखळी,रेशन दुकानदाराकडून असे धान्यावर डल्ला मारला जात आहे.गरिबांच्या तोंडातून काढल्या जात असलेल्या धान्याची तस्करी रोकायची असेलतर जिल्ह्या बाहेरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नेमून प्रत्येक महिन्याला तपासणी करावी अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here