एसटी स्टँडसमोर सांडपाण्याचा डोह | महामार्गाच्या अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी गटारीचे प्रवाह अडले

0



जत,प्रतिनिधी : जत शहरात विजापूर-गुहागर महामार्गाचे काम सुरू आहे.अनेक अडथळ्यानंतर सुरू झालेल्या कामात ठेकेदार कंपनीचा भोगळपणा समोर आला आहे. कुठेही पुर्ण काम केले नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.स्टँडनजिकच्या गटारीचे काम पुर्ण केले नसल्याने बसस्थानकातील स्वच्छता गृहातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा इन गेटजवळ डोह तयार झाला असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक,व्यवसायिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.






जत शहरातील महामार्गाचे उमदी फाटा ते शेगाव चौकापर्यतचे काम सुरू आहे.

हे काम करताना ठेकेदार कंपनीकडून पर्यायी रस्ता,गटारीची सोय केली नाही.कुठेही रस्ता खोदला आहे.कुठेही क्रॉक्रिटीकरण केल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणीचे ठरत आहेत. काम सुरू असलेला शहरातील दीड किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी वाहनधारकांना अर्धा,अर्धा तास लागत आहे.त्याशिवाय रस्त्याच्या गटारीचे काम रस्ता काम करण्याअगोदर करण्याची गरज होती.






मात्र रस्ता सुरू असतानाच गटारीचे काम करण्यात येत आहे.तेही आर्थिक लाभामुळे सोयीच्या ठिकाणी तुकडे,तुकडे करून केले जात आहे.त्यामुळे सांडपाणी वाहून जात नसल्याने अनेक ठिकाणी नव्याने बांधलेल्या गटारी भरल्या आहेत.त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.एसटी स्टँडबाहेरील गटारीमुळे प्रवाशांना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे.पुढील काही दिवसात पाण्याचा डोह भरून रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही.




Rate Card




ठेकेदार कंपनीकडून पैसे देणाऱ्या ठिकाणची लवकर कामे


शहरातील रस्त्याचे काम करताना ठेकेदार कंपनीचे काही कर्मचारी गटारी बांधणे,त्यावर झाकणे,मुरम टाकण्यासाठी लगतच्या नागरिकांना पैसे मागत असल्याचे आरोप आहेत.जे नागरिक पैसे देतात.त्यांच्या समोरची कामे तातडीने केली जातात.अशी अर्धवट व तुकडे,तुकडे करून होत असलेल्या कामामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.









जत शहरातील स्टँडबाहेर गटारीचे काम अर्धवट सोडल्याने सांडपाण़्याचा डोह तयार झाला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.