जत,प्रतिनिधी : जत शहरातील शेगाव चौकात सापडलेल्या चंदन तस्करातील संशयित राजू चन्नाप्पा भोसले (वय 32,रा.पंढरपूर),सिताराम बळिराम चंदनवाले(वय 19,रा.रोपळे ता.पंढरपूर)
या दोघा चंदन तस्करांना जत न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चंदन तस्करी सुरू आहे.जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मोठ्या प्रमाणात चंदनाची मोठी झाडे आहेत.
चंदन तस्कर अशा झाडाची मध्यरात्री शिकार करत तस्करी करत आहेत.चंदन तस्कराची मोठी टोळी जत तालुक्यात कार्यरत आहे. पोलीसांनी या तस्करांच्या टोळीतील दोघांना पकडत त्यांच्याकडून सुमारे एक लाख वीस हजार रूपयाचे 23 किलो चंदन व दुचाकी जप्त केले आहे.आता त्यांच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने संशयिताला दोन दिवस कोठडी सुनावली आहे.आता पोलीस कुठेपर्यत शोध लावतात हे पाहणे औसुक्याचे आहे.