शिवसेना नेते संजय सावंत सपत्नीक पंढरीला रवाना

0



जत,प्रतिनिधी : शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय सावंत यांनी गत वर्षीप्रमाणे या वर्षीही शिवसेनेचा मुख्यमंत्री कायम रहावा, आघाडीचे शासन पाच वर्षे टिकावे यासाठी पत्नी सौ. रूपाली सावंत यांच्यासह व  ग्रामस्थांबरोबर  अनवाणी पायी बनाळी ते पंढरपूर असे वाहनाने रवाना झाले आहेत.








गतवर्षी नोव्हेंबर 2019 मध्ये सांवत दांपत्य यांनी पायीवारी केली होती.दरम्यान पंढरीच्या विठुरायाने आशिर्वाद दिल्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला सावंत यांना सपत्नीक आमंत्रण दिले होते.यावर्षी मात्र कोरोणाच्या महामारीमुळे पंढरीची पायीवारी न करता सावंत सपत्नीक व ग्रामस्थांसोबत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला शनिवारी सकाळी चारचाकी वाहनाने रवाना झाले आहेत.यावेळी बनाळीचे शिवसेनेचे शाखाध्यक्ष राहुल पाटील,हनुमंत कोरे,बी.आर.सावंत,ए.आर.सावंत,केशव सावंत,राजाराम सावंत,केशव सावंत,चंद्रकांत सावंत,जी.एच.सावंत,महादेव लिगाडे,दत्तात्रय लिगाडे,उद्धव सावंत, सिद्राम माळी, हनुमंत कोरे,सुनील देवकर,मारुती देवकर,सौ. नंदिनी कोरे,चंद्रकांत कोरे.गणेश सावंत आदी उपस्थित होते.







Rate Card



सावंत यांनी तालुक्यातील बनाळी येथील बनशंकरी मंदिरात सकाळी भजन केले,त्यांनी पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकाराशी संवाद साधत ते म्हणाले की,तालुक्यातील दुष्काळाचा कलंक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुसावा अशी तालुकावसीयांची भावना आहे.कारण 2013 ला जत पूर्व भागातील 44 गावांतील नागरिकांनी आम्हाला पाणी द्या नाहीतर कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता.त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जत पूर्व भागाचा तातडीने दौरा करत दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.






आता सध्या ते मुख्यमंत्री असल्याने जत तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसतील असा विश्वास आहे.महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट न येता राज्य कोरोनामुक्त व्हावे असे विठ्ठलाला साकडे घालणार आहे. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरीचा प्रसाद, चंद्रभागा नदीचे पवित्र तीर्थ व नामदेव पायरीला नतमस्तक होऊन तुळशीमाळ मातोश्री येथे जाऊन मुख्यमंत्री यांना देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.




शिवसेना नेते संजय सावंत सपत्नीक बनाळीहून पंढरीला रवाना झाले


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.