रेशनच्या काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्याला पुरवठा विभागाचेच बळ ?

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील रेशनचे तांदुळ काळ्या बाजारात जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत असतानाही,जतचे पुरवठा विभाग उंटावरून शेळ्या राखण्याचा उद्योग करत असल्याचे आरोप होत आहे.जतचे तहसीलदार यांच्याकडूनही अशा प्रकाराला गांर्भिर्याने घेतले जात नसल्याने कोरोना काळात गरीबासाठी आलेले धान्यावर धान्य दुकानदारांकडून डल्ला मारून ते काळ्या बाजारात विकले जात असल्याचे शनीवारी दोन वेगवेगळ्या घटनेवरून समोर आले आहे.


तालुक्यात असे काळ्या बाजारात जाणारे 100 पोतीपेक्षा जास्त तांदुळ,गहू जप्त करण्यात आले आहे.पोलीसात गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र हा तांदुळ कोणत्या दुकानातून आला यांचा शोध ना पोलीसांना लागला आहे.ना जतचा पुरवठा विभागाने तो लावण्याचा प्रयत्न केला.तालुक्यात पुरवठा विभागाला प्रत्येक महिन्याला रेशन दुकानाकडून काही रक्कम दिली जात असल्याने अशा प्रकाराला त्यांच्याकडून जाणूनबुजून बळ दिले जात असल्याचा आरोप दरिबडची ग्रापंचायतीचे सदस्य अमसिध्द शेंडगे यांनी केला आहे.


Rate Card

शनिवारी बनाळी येथे रेशनचे धान्य वाहतूक करणारा पिकअप टेम्पो,दरिबडची येथून काळ्या बाजारासाठी तांदुळ,गहू,साखर भरलेली टाटा सफारी गाडी नागरिकांनी पकडून संख अप्पर तहसीलच्या ताब्यात दिली आहे. 

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.