डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देत पाहणी करत,कर्मचारी, रुग्णांशी संवाद साधला.
कोरोना काळात तब्बल 2200 जणाचे स्वाब घेत प्रभावीपणे काम करणारे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांचा यावेळी आ.पडळकर यांच्याहस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाऊसो दुधाळ,विशाल पाटोळे,विक्रम शिंदे,ओंकार माळी,पोपट पाटोळे,प्रशांत बन्ने,डाॅ.कोळेकर,विकास थोरात,कोळी सुपरवायझर,रेश्मा मुल्ला,नजिमा शेख,महालिंग नंदिवाले,संकेत पाटोळे,भारत गस्ते,अंकित मिसाळ,दता जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
डफळापूर : डॉ.अभिजीत चोथे यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.