डफळापूरचे सचिन माळी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष
डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील सचिन विलास माळी यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
डफळापूर येथील वरदविनायक पतसंस्थेचे चेअरमन तथा माळी समाजातील युवा नेते म्हणून सचिन माळी यांची परिसरात ओळख आहे.अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात.महात्मा फुलेच्या विचारांचा प्रसार,संघटन करण़्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी माळी यांच्यावर दिली आहे.देशभर विस्तार होत असलेल्या महात्मा फुले ब्रिगेडमुळे सामाजिक क्षेत्रात वेगळी ऊर्जा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
निवडीनंतर सचिन माळी म्हणाले,महात्मा फुले ब्रिगेडच्या जिल्हाभर विस्तार वाढविण्याबरोबर महात्मा फुलेचे विचार रुजविण्याचा माझा प्रयत्न राहिल.