नगरपरिषदेसमोर आज ‘खर्डा‌ भाकरी’ आंदोलन | प्रलंबित दिव्यांग कल्याण निधी देण्याची मागणी

0
2

जत,प्रतिनिधी : आश्वासन देऊनही जत नगरपरिषदकडील प्रलंबित असलेला दिव्यांग कल्याण निधी दिवाळीपूर्वी दिव्यांग बांधवांना दिला नसल्याने आज पाडव्याच्या दिवशी

नगरपरिषदेसमोर आज खर्डा‌ भाकरी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती,युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिली.आम्ही गेल्या सहा महिन्यापासूूून 

मागणी करत आहोत.








मुख्याधिकारी,पदाधिकारी यांनी दिव्यांगाचा निधी हडप करण्याचा उद्देश्य स्पष्ट झाला आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतलो आहोत,तसे निवेदन  नगरपरिषदेकडे दिले असल्याचेही ढोणे म्हणाले.

निवेदनात म्हटले आहे,जत शहरातील दिव्यांग बांधवांचा दिव्यांग कल्याण निधी जत नगरपरिषदेकडून सन 2012 पासूनचा देणे प्रलंबित असून तो व्याजासह दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वी देण्याची मागणी केली होती, अन्यथा दिवाळीत नगरपरिषदे समोर शिमगा करण्याचा इशारा विक्रम ढोणे यांनी दिला होता. 








प्रलंबित दिव्यांग कल्याण निधीसाठी जत नगरपरिषदेच्या स्थापने दिवशी 8 जून 20 रोजी याप्रश्नी लक्षवेधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्यानंतर जत नगरपरिषदेने लेखी आश्वासन देऊन पुढील सर्वसाधारण सभेत विषय घेऊन दिव्यांग बांधवांचा प्रश्न निकालात काढण्याचे लेखी आश्वासन देऊन लक्षवेधी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती.परंतु नगरपरिषदेने आजपर्यत कोणतीही कार्यवाही केली नाही.यावरून जत नगरपरिषदेचा दिव्यांग कल्याण निधी हडपण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे.










जत नगरपरिषदेने वेळकाढूपणा न करता शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांचा दिव्यांग कल्याण निधी हा त्यांच्या हक्काचा असून तो जत नगरपरिषदेकडील 2012 पासूनचा प्रलंबित असलेला दिव्यांग निधी व्याजासह दिव्यांगाना दिवाळीपूर्वी देऊन दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करावी अन्यथा ऐन दिवाळीत जत नगरपरिषदे समोर शहरातील सर्व दिव्यांग बांधव आंदोलन करतील असा इशारा नव्याने युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिला होता तरी सुद्धा नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने अखेर दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन दीपावली पाडव्याच्या दिवशी नगरपरिषद कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here