आवंढी येथे शेळीपालन प्रशिक्षण संपन्न

0



आवंढी,वार्ताहर : आवंढी ता.जत येथे बँक ऑफ इंडिया,ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व ग्रामपंचायत आवंढी यांच्या विद्यमाने महिलांसाठी शेळीपालनाचे 10 दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. 

शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बँक आर से टीचे संचालक श्री.पठाण,श्री.पाटील,सरपंच आण्णासाहेब कोडग यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी उपसरपंच आण्णासाहेब बाबर,माजी सरपंच श्रध्दा गेजगे,ग्रामसेविका शिंदे,मुख्याध्यापक श्री.माने,श्री.कांबळे,श्री.माळी,उषा बाबर,रत्नप्रभा कोडग व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.








गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी शेळीपालन प्रशिक्षण आयोजित केले होते.शेळीपालन करत असताना येणाऱ्या अडीअडचणी,शेळ्यांना येणारे आजार,उपचार, खाद्य,या सर्व बाबीवर तज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.समारोप प्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.ढेरे,सरपंच श्री.कोडग,पठाण,माळी,पाटील व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

Rate Card









आवंढी ता.जत‌ येथे 10 दिवसाच्या शेळीपालन प्रशिक्षण शिबिरास उपस्थित मान्यवर व महिला

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.