मुंचडीचे रमेश पाटील राष्ट्रवादी कॉग्रेसचे‌ तालुकाध्यक्ष | उत्तम चव्हाण कार्याध्यक्ष,अँड.बसवराज धोंडमनी जिल्हा कार्यकारणीवर

0

जत,प्रतिनिधी : जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुचंडीचे रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.युवक नेते उत्तम चव्हाण यांची जत तालुका कार्याध्यक्ष तर माजी तालुकाध्यक्ष अँड.बसवराज धोंडमणी यांना पुन्हा मानाचे स्थान देत जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अनेक महिने जत तालुका अध्यक्ष व पदाधिकारी निवडी रेंगाळल़्या होत्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जत तालुक्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या.अँड. चन्नाप्पा होतीकर यांनी जत तालुक्याच्या अध्यक्षपदासाठी रमेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली तर सुरेश शिंदे यांनी अनुमोदन दिले. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी रमेश पाटील यांची तालुकाध्यक्ष निवडीची घोषणा केली. जवळपास 15 वर्षे बिळूरचे अँड.बसवराज धोडमणी हे तालुकाध्यक्ष होते. तालुकाध्यक्ष पदासाठी उत्तम चव्हाण व उमदीचे अँड.चन्नाप्पा होर्तीकर इच्छुक होते.मात्र होर्तीकर यांनीच रमेश पाटील यांचे नाव सूचविल्याने राजकीय गणित समजू शकले नाही.Rate Card

लिंगायत समाजाचे‌ मोठे प्राबल्य असलेल्या तालुक्यात भविष्यातील मोर्चेबांधणी गृहीत धरून लिंगायत समाजातील मातब्बर नेते यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर त्यांच्याबरोबर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकत वाढविण्याच्या दृष्टीने युवा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण यांना कार्याध्यक्ष सोपविण्यात आले आहे.त्याशिवाय माजी तालुकाध्यक्ष अँड.बसवराज धोंडमणी यांना जिल्हाध्यक्ष पदी निवडण्यात आले आहे.
 राष्ट्रवादी कॉग्रेसला गतवैभव आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान लिंगायत समाजातील दोन नेत्यांना पदाधिकारी निवडीत‌ संधी दिल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये लिंगायत समाजाचे प्राबल्य वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.