दिवाळी खरेदीसाठी गर्दी.. | जत तालुक्यातील बाजार फुलेले.. | फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष..

0

संख,वार्ताहर : जत तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगी दिल्यानंतर तालुक्यातील आठवडे बाजार नेहमीप्रमाणे भरण्यास सुरुवात झाली. यामुळे ऐन दिवाळीत नागरिक, व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. दिवाळी तोंडावर आल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकाने व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती मात्र सर्व कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर,फिजिकल डिस्टन्सिंग याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.पूर्व भागातील संख,दरीबडची, माडग्याळ, उमदी,तिकोंडी, डफळापूर, शेगाव,बिळूर, आसंगी (जत),कोंतवबोबलाद,जाडरबोबलाद आठवडा बाजार सात महिन्यानंतर सरु झाले.बाजारात खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता.आठवडा बाजार सुरळीत सुरू झाल्याने आर्थिक उलाढाल आता पूर्व पदावर येत आहे.मात्र व्यापारी,शेतकरी हे जणू काही कोरोना हद्दपार झाला आहे. अशा भ्रमात नागरिक, व्यापारी वावरत आहेत.बहुतांश नागरिक, व्यापारी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सनचे नियम पाळत नाहीत.यामुळे कोरोनाचा आता धोका वाढला आहे.

     शासनाकडून नेहमी कोरोना संदर्भात जनजागृती केली जात आहे मात्र नागरिक स्वतः बरोबर इतरांचा ही जीव धोक्यात घालून बाजारात फिरताना दिसत आहेत Rate Card
” नागरिकांना कोरोनाची भीती राहिली नाही. वारंवार सांगूनही नियम पाळण्याकडे नागरिक, व्यापारी दुर्लक्ष करीत आहेत.’नो मास्क,नो एंट्री’ करण्याची गरज आहे.नियम तोडणा-यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.”


अम़गसिध्द शेंडगे

ग्रामपंचायत सदस्य,दरीबडची.

 जत तालुक्यात आठवडा बाजार सुरु झाल्याने ग्राहकांनी अशी गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.