अतिवृष्ठीतील बाधित शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रकार थांबवा : सोमलिंग बोरामणी

0
3

बालगाव,वार्ताहर : जत पुर्व भागात‌ अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र  कृषी अधिकारी यांच्या‌ चुकीच्या कार्यपध्दतीमुळे शेकडो शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळच‌ लक्ष घालून प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी, बेळोंडगी सोसायटीचे‌ चेअरमन सोमलिंग बोरामणी यांनी केली आहे.

जत पुर्व भागासह तालुक्यात‌ गेल्या महिन्यात‌ झालेल्या अतिवृष्ठीमुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.





 सध्या शासन स्तरावरून आदेश असतानाही जतचे भूमीपुत्र अधिकारी, कर्मचारी,ग्रामसेवक,तलाठी यांच्याकडून या पिकांचा पंचनामा करता येत नाही म्हणून नुकसान ग्रस्त शेतकरी वगळण्याचा सपाटा लावला आहे. कृषी सहाय्यक चुकीची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत‌ आहेत.यापुर्वीही नुकसान होऊनही पिकविमाही शेतकऱ्यांना अद्याप देण्यात‌ आलेला नाही.





आताही तोच प्रकार होत‌ असून कृषी विभागाकडून सुधारणा करावी,अशी मागणी बोरामणी यांनी केली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी,तहसीलदार यांना दिले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here