डफळापूर, वार्ताहर : बेळूंखीत चव्हाण दुध संकलन केंद्राकडून दिवाळी मदत म्हणून दिवाळी साहित्याचे किट वाटप करण्यात आले.बेंळूखी येथील विशाल चव्हाण,जोतीराम चव्हाण या बंन्धूकडून चव्हाण दुध संकलनच्या माध्यमातून बेंळूखीत पशूपालक शेतकऱ्यांकडून दुध संकलन करण्यात येत आहे.
पारदर्शी वजन,शुध्दता,योग्य दर व बिलाचे वाटप यामुळे चव्हाण संकलन केंद्राला पशूपालक शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.कोकळे येथील धनाजी भोसले यांच्या डेअरीला हे दुध पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या किट वाटपामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. सर्वाकडून समाधान व्यक्त होत आहे.