बागेवाडीत वायरमेनच्या दुर्लक्षामुळे विजपुरवठ्याचा खेळखंडोबा

0

जत,प्रतिनिधी : बागेवाडी ता.जत येथे विज कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी,नागरिकांना वारवांर विज खंडित होणाऱ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.आताही मंगळवापासून गेल्या तीन दिवसापासून विज‌पुरवठा खंडित आहे.बागेवाडीच्या कामगिरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना यांची माहिती देऊनही त्यांच्या कडून गांर्भिर्याने घेतले जात नाही.परिणामी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या रब्बीच्या हंगामातील पिंकाना पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव सुरू आहे.


त्यातच तीन तीन दिवस विज खंडीत ठेवली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.दुसरीकडे वाढलेल्या वृक्षाच्या‌ फांद्यामुळे विद्युत वाहिन्याला घर्षण होऊन सातत्याने विज पुरवठा खंडीत‌ होत आहे.येथे नेमणूक असणाऱ्या कर्मचाऱ्यांस हा प्रकार माहिती असूनही त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. यात तातडीने सुधारणा करावी,अन्यथा शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयाच्या‌ सबस्टेशनवर आंदोलन करू असा इशारा होलार समाज संघटेनेचे संस्थापक आबासाहेब ऐवळे यांनी दिला आहे.

Rate Card


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.