शिक्षकाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाई करा | शिक्षक भारतीच्या वतीने मागणी

0जत,प्रतिनिधी : एका दैनिकात संपादकांनी संपादकीय लेखांमध्ये शिक्षकांच्या बाबतीत अतिशय घृणास्पद व असंवेदनशील विधाने केलेली आहेत.त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष, संतापाचे वातावरण पसरले आहे.त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जत (सांगली) तालुका शिक्षक भारतीच्या वतीने जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात‌ म्हटले आहे कि,शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अवमान केला आहे.त्यांनी शिक्षकांच्या विषयी असंवैधानिक भाषा वापरली आहे.तातडीने उचित कारवाई न झाल्यास  शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती तीव्र आंदोलन करेल.यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत,उपाध्यक्ष अविनाश सुतार,जितेंद्र बोराडे,बाळासाहेब सोलनकर,रावसाहेब चव्हाण,आप्पासाहेब ढोणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 

Rate Card


   

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.