कुणी पाणी,देता का पाणी.! | जत नगरपरिषदेच्या अजब कारभारचा गजब नमुना

0जत,प्रतिनिधी : जत शहरापासून 2 किलोमीटच्या अंतरावर असणारा नारू मळा,आदाटे वस्ती, माने वस्ती,चौगुले वस्ती,गणाचारी वस्ती व कांबळे वस्ती या वस्त्यांना गेल्या 30 वर्षापासून पाण्यापासून नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे वंचित ठेवले आहे.वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी करून देखील या लोकवस्तीवर पाणी येऊ शकले नाही. ग्रामपंचायत असल्यापासून येथील रहिवाशी पिणाच्या पाण्यासाठी लढत आहेत.पण सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी फक्त पोकळ आश्वासनाशिवाय नागरिकांना पदरात काहीच दिले नाही.आमदारकी असो वा खासदारकी वा ग्रामपंचायत वा नगरपरिषद फक्त राजकीय नेत्याकडे पोकळ आश्वासने दिले‌.मात्र पाण्यासाठीची वणवण पाचवीला ‌पुजलेली कायम आहे.जत ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदमध्ये झाले.नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पाणी मिळेल अशी आशा होती.मात्र आठ वर्षात परिस्थिती तसूभरही हलली नाही.येथील नागरिकांच्या सायकलीला घागरी,महिलाच्या डोक्यावरील हंडा कायम आहे. या प्रभागातून परशुराम मोरे, सायबा कोळी,मंदाकिनी बेंळुखी,उमेश सावंत हे निवडून आले.तात्कालिक मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे नगरसेवक परशुराम मोरे,व महादेव कोळी यांनी पाठपुरावा करून पाईपलाईनचे काम मंजूर करून घेतले.काम सुरू झालं काम अर्ध्यावर आले होते.
Rate Card
दरम्यानच्या काळात नगरपरिषदेची निवडणूक लागली आणि पाईपलाईनचे काम थांबले. नागरिकांच्या तोडापर्यत आलेले पाणी थांबले. पाईपलाईनचे काम चुकीचे आहे असे सांगत सत्ताधाऱ्यांनी पुढे हे काम चालू केले नाही. त्यावरती ठोस पावले ही उचलेली नाहीत.पाईपलाईनसाठी गेल्या 30 वर्षात 10 वेळा सर्व्हे झाला,पण पुढे काय अंमलबजावणी झाली नाही.हे मोठं दुर्देव आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी व विरोधक यांच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेच्या बळी जात असल्याचे चित्र आहे.गेल्या 30 वर्षांपासून आश्वासनशिवाय येथील नागरिकांना काहीच मिळालेलं नाही.
नागरिकांचा अत पाहू नये ; परशुराम मोरे


गेल्या 30 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या या भागातील नागरिकांनसोबत राजकारण न करता या भागातील तहानलेल्या नागरिकांना पाणी देऊन तहान भागवावी,अन्यथा रस्त्यावर उतरू असा‌ इशारा माजी सभापती परशुराम मोरे यांनी दिला आहे. 
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.