जत,प्रतिनिधी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील अन्नपदार्थांची भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध
प्रशासन झोपेत आहे.जत तालुकाभर भेसळखोरांनी बाजार मांडला आहे.धान्य,तेले,दिवाळी पदार्थातील भेसळ जीवघेणी ठरत आहे.
दिवाळी सण तोंडावर आल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. या निमित्ताने अन्नपदार्थ खरेदीची मोठी उलाढाल होते. खाद्यतेल, बेसन, रवा, गूळ, डाळींना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात बरेच पदार्थात भेसळ वाढली आहे.अशा स्थितीत भेसळ करणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कुठेच दिसत नसल्याचे वास्तव आहे.जत तालुक्यात दुधाची भेसळ वाढली आहे.कारवाई कुठेच होत नसल्याने सर्वत्र अलबेल आहे.